आमच्याबद्दल

जटपुरा गेटवरचे दुकान, आणि त्यामागची माणसे

संजय इलेक्ट्रिकल्स 1992 पासून चंद्रपूरमध्ये आहे. WireIt हे त्याच दुकानाचे नवे रूप आहे, दुसरी कंपनी नाही.

संजय इलेक्ट्रिकल्सचंद्रपूर33वर्षांचा विश्वास1992 पासून

आमची सुरुवात

26 ऑक्टोबर 1992 रोजी जटपुरा गेटजवळ एक छोटे इलेक्ट्रिकल दुकान सुरू झाले. सुरुवातीला वायर, स्विच आणि होल्डर एवढेच होते. लोक सामान घ्यायला यायचे आणि जाता जाता विचारायचे, "हे बसवून कोण देईल?" त्या प्रश्नातूनच आमचे दुरुस्तीचे काम सुरू झाले.

आज त्याच दुकानातून पंखे, गिझर, मोटार, एमसीबी आणि घराची पूर्ण वायरिंग असे सगळे काम होते. दुकान आमच्या मालकीचे आहे, भाड्याचे नाही. त्यामुळे आमचा खर्च कमी राहतो आणि तोच फायदा आम्ही किमतीत देऊ शकतो.

संस्थापक

ज्योती लक्कावार

WireIt चे संस्थापक


WireIt का?

फोनवर "किती होईल?" या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर देता येत नाही, कारण घर पाहिल्याशिवाय काहीच सांगता येत नाही. म्हणून आम्ही उलटे केले. तुम्ही भेट बुक करता, आमचा माणूस येतो, घर तपासतो, लिहून देतो आणि मगच किंमत सांगतो. काम करायचे की नाही, हे पूर्णपणे तुमचे ठरते.

आम्ही काय पाळतो

  • किंमत आधी सांगितली जाते. काम झाल्यावर आकडा बदलत नाही.
  • जे तपासले तेच लिहितो. न पाहिलेल्या गोष्टीबद्दल आम्ही लिहीत नाही.
  • गरज नसेल तर "बदला" असे सांगत नाही.
  • सामान बाजारभावाने. आमचा नफा कामात आहे, सामानात नाही.

आम्ही कुठे येतो

जटपुरा गेटपासून 4 किलोमीटरच्या आत. एवढ्याच भागात आम्ही वेळेवर पोहोचू शकतो, म्हणून तेवढ्याचीच हमी देतो.

संपूर्ण हद्द पहा

दुकानात या

सामान पाहायचे असेल किंवा नुसते विचारायचे असेल, तरी या. फोन करूनही चालेल.

Near Ganesh Temple, Jatpura Gate, Chandrapur 442401

+91 9637972388